E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ठाण्यात एटीएसचे छापे
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पडघा, बोरीवली गावातून १२ जण ताब्यात
मुंबई : महाराष्ट्र दहशततवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये सिमी दहशतवादी संघटनेचे तत्कालिन म्होरके आणि सदस्यांचा समावेश होता. कारवाईत एटीएसने १२ जणांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईतील दहशतवाद विरोधी पथक, ठाणे ग्रामीण पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील पडघा आणि बोरीवली गावात काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. दोन्ही गावात मोठा फौजफाटा आणला होता २४ हून अधिक घरांची झडती घेतली. त्यामध्ये सिमीचा साकीब नाचन, अकिब सादीक नाचन, अब्दुल लतिफ कासकर, कैफ नाचन आणि शाजील नाचन यांंच्या घराचा समावेश होता. जमिनी व्यवहारातील दलाल आणि सिमीचा माजी सदस्य फराक झुबीर मुल्ला (वय ६०) याच्याशी घराची झडती घेतली. तपासात उघड झाले की, मुल्ला हा हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेला आहे. त्याचा मोठा भाऊ हसीब मुल्ला हा २००२ आणि २००३मध्ये मुंबईतील रेल्वे बाँब स्फोटातील दोषी आहे. त्याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तो ९ डिसेंबर २०२३ पासून साकिब नाचन याच्यासोबत दिल्लीतील तुरुंगात आहे. आयसिसच्या धर्तीवर भारतात सिमीने दहशतादी हल्ले करण्यााचे कारस्थान रचले होते. कारवाईत अब्दुल लतिफ कासकर (वय २७) याच्या घराची झडती घेतली. तो एका गोदामात काम करतो. तो फरहान सुस याचा जवळचा मित्र आहे. त्याला ताब्यात घेतले आहे. तपासात सहाजण हाती आलेले नाहीत. कारवाई दुपारपर्यत सुरू होती. अनेक संशयितांची अनेक तास चौकशी करण्यात आली. १२ जणांना नंतर पडघा पोलिस ठाण्यात नेले. त्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. दरम्यान, एनआयएने २०२३ मध्ये सिमीविरोधात देशव्यापी मोहीम राबविली होती. तेव्हा पडघा आणि परिसरात कारवाई करुन देशविरोधी कारवाया प्रकरणी काही जणांना अटक केली होती. त्यात साकिब नाचन याचा समावेश होता.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानास सीमाभिंत बांधण्याच्या कामाला गती
11 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानास सीमाभिंत बांधण्याच्या कामाला गती
11 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानास सीमाभिंत बांधण्याच्या कामाला गती
11 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानास सीमाभिंत बांधण्याच्या कामाला गती
11 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक